भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाचा कार्यकारिणी विस्तार; ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने समावेश

लोणावळा: भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाच्या कार्यकारिणीचा दुसरा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. या विस्तारामध्ये विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुमित्रा हॉल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा पंधरवाडा’ या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्षा…

Read More

मावळ वार्ता फाउंडेशन आयोजित नवरात्री ‘मेगा फायनल कॉम्पिटिशन’ अध्यक्षपदी आशिष बुटाला

लोणावळा: मावळ वार्ता फाउंडेशनची बैठक ११ सप्टेंबर रोजी श्री शितला माता मंदिर, गावठाण येथे पार पडली. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ‘मेगा फायनल कॉम्पिटिशन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फाउंडेशन दरवर्षी २६ जानेवारी, गोकुळाष्टमी आणि नवरात्रीसारखे विविध कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करत असते. याच परंपरेनुसार, यंदाही नवरात्रीच्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार…

Read More

प्रशांत दादा भागवत: राजकारणापलीकडचे पर्यावरणपूरक नेतृत्व

मावळ, (प्रतिनिधी): राजकारणात केवळ घोषणा आणि आश्वासनांची परंपरा मोडत, मावळमधील युवा नेते प्रशांत दादा भागवत यांनी प्रत्यक्ष कृतीतून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची ही वाटचाल केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील समाजसेवक आणि निसर्गप्रेमी म्हणून लोकांच्या मनात…

Read More

लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती, पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार!

पुणे: मावळ तालुक्याला जागतिक पातळीवर पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी लोणावळा स्काय वॉक प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजगार आणि विकासाचे नवे दालन या…

Read More

मावळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवरून भाजप सोशल मीडियाचा प्रशासनाला इशारा

मावळ: मावळ तालुक्यात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याव्यतिरिक्त, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल दाखले मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त आहेत. या गंभीर समस्यांवरून भाजप सोशल मीडिया मावळ तालुक्याने प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन…

Read More

महिला आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या लोणावळा पोलिसांच्या जाळ्यात; अनेक गुन्हे उघड

लोणावळा: महिला आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील पोलिसांना हवा असलेला आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार उर्फ सालट याला पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटक राज्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. सप्टेंबर २०२३ मध्ये, लोणावळा उपविभागाचे…

Read More

लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांना अटक, ५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा: वलवण येथील पुलाखाली सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी छापा टाकून १३ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि एक कार असा एकूण ५,८९,०३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून वलवण पुलाखाली जुगार सुरू असल्याची माहिती…

Read More

मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांचा ‘इंद्रायणी माई’साठी अनोखा उपक्रम

इंदोरी – गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण असला तरी, विसर्जनानंतर घाटांची होणारी दयनीय अवस्था अनेकदा विषण्ण करणारी असते. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडलेल्या मूर्ती आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे धार्मिक कार्याला गालबोट लागते, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. हीच वेदना लक्षात घेऊन, पर्यावरणप्रेमी प्रशांत दादा भागवत आणि मुकाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा…

Read More

गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती निकम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

लोणावळा : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे ७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात मावळ तालुक्यातील आणखी काही शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये संत ज्ञानेश्वर…

Read More

प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी इंदोरी, मावळ, दि. ८ (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी…

Read More