लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाळेकर, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार वाळंज यांची निवड
लोणावळा: लोणावळ्यातील नामांकित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सेवा प्रदान करणाऱ्या ‘लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग पाळेकर तर उपाध्यक्षपदी नंदकुमार सोनू वाळंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी या दोन अनुभवी नेतृत्वांकडे धुरा सोपवण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष दत्तात्रय पाळेकर हे मागील ३५ वर्षांपासून या संस्थेशी एकनिष्ठपणे जोडले गेले…
