लोणावळ्यात जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, पण मंडळांमध्ये नाराजी
लोणावळा: अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर लोणावळ्यातील लाडक्या बाप्पाला उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सुमारे नऊ तास चाललेल्या या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजेचा बोलबाला दिसून आला. मात्र, मिरवणुकीला झालेल्या विलंबामुळे शेवटच्या गणेश मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. लोणावळ्याची गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी 5:30 वाजता शेतकरी पुतळा चौकातून सुरू झाली आणि रात्री 2:30 वाजता…
