मनोज जरांगे पाटलांच्या वादळाला लोणावळ्यातून पाठिंबा; टॅक्सी असोसिएशन धावली मदतीला!

format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 3; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 207.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 36;

लोणावळा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाखो मराठा बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. याच धडकेत लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशननेही आपली सामाजिक बांधिलकी दाखवत पुढं सरावली आहे.

गुरुवारी सकाळपासूनच मुंबई-पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांचा महासागर मुंबईकडे कूच करत आहे. मिळेल त्या वाहनाने निघालेल्या या योद्ध्यांना प्रवासात कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आणि संघटना पुढे येत आहेत. लोणावळा शहरातील कुमार रिसॉर्ट चौकात लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या थांबवून त्यातील आंदोलकांना फळे, चिक्की आणि बिस्किटांचे वाटप केले.

रस्त्याने जात असताना मिळत असलेल्या या भरघोस प्रतिसादामुळे आंदोलकांमध्ये एक नवा जोश संचारला आहे. मराठा आरक्षणाचे हे वादळ आता आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ विश्वास आंदोलकांच्या डोळ्यात दिसत आहे आणि त्याला राज्यातील प्रत्येक चौकातून, प्रत्येक गावातून मिळत असलेला पाठिंबा या लढ्याची धार अधिकच तीव्र करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *