लोणावळा : निवडणूक आल्या की पैसा, दारू पार्ट्या असे प्रकार सुरू होतात. यामधून आपण काय साध्य करतोय.. राजकारण करायचे असेल तर ते विकासाचे करा.. तरुणांना विकासाच्या.. रोजगाराच्या वाटा दाखवा.. त्यांना व्यसनाधीन करू नका.. महिलांना स्वावलंबी बनवण्याचे राजकारण करा… केवळ निवडणुका डोळ्या समोर ठेऊन नाही तर कायम त्यांच्या सोबत रहा… असे आवाहन करताना कामगार नेते विजयराव पाळेकर यांनी मागील अनेक वर्षापासून नांगरगाव प्रभागात व लोणावळा शहरात विकास कामे करण्यात कायम पुढे असणारे तरुण व उमदे नेतृत्व असलेले सुभाष सुमंत डेनकर व ब्रिंदा अनिश गणात्रा यांना नागरिकांनी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे हे देखील तरुण व विकासाची दूरदृष्टी असणारे तरुण तडफदार नेतृत्व असल्याने त्यांना देखील सर्वांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे.
नांगरगाव प्रभागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे, नगरसेवक पदाचे उमेदवार सुभाष सुमंत डेनकर व ब्रिंदा अनिश गणात्रा यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नांगरगाव प्रभागाच्या विकासाचा ध्यास घेतलेले हे उमेदवार मागील अनेक वर्षापासून येते नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जात आहेत. गावाच्या विकासासाठी व समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले हे विकासाभिमुख उमेदवार असल्याने नागरिकांनी आपले मत विकासाला द्यावे असे आवाहन विजयराव पाळेकर यांनी केले आहे.

