लोणावळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार धडाक्यात; नांगरगाव प्रभाग ५ मध्ये भव्य प्रचारफेरी

लोणावळा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जोरदार प्रचार मोहीम सुरू केली. प्रभाग क्रमांक ५ (नांगरगाव) आणि प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. राजेंद्र दिवेकर सर यांच्या प्रचारफेरीचा शुभारंभ नांगरगाव येथील दत्त मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.

​यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे, पुणे जिल्हा सल्लागार प्रमुख मारुतीभाऊ खोले यांच्यासह माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, उपशहरप्रमुख उल्हास भांगरे आणि अनेक आजी-माजी प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरातून सुरू झालेली ही प्रचारफेरी नांगरगाव येथील शिक्षक सोसायटी, बाजारपेठ, इंद्रायणी नगर आणि हुडको परिसरातून फिरून प्रचाराचा समारोप करण्यात आला. या प्रचारानिमित्त नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि उत्साहाचा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. शिवसेनेच्या नेतृत्वात लोणावळ्याच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *