इंदुरीत ‘विघ्नहर’कडून महिलांचा सन्मान सोहळा; ‘महिला सन्मान ठेव’ धारक भगिनींना आकर्षक पैठणी भेट!
इंदुरी (प्रतिनिधश्री विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदुरी यांच्या वतीने दसरा-दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर “महिला सन्मान ठेव योजना २०२५” अंतर्गत महिलांच्या सन्मानाचा एक भव्य आणि उत्साही सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज, शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयात या योजनेत मुदत ठेव (Fixed Deposit) केलेल्या महिलांना खास आकर्षक पैठणी साडी भेट देऊन गौरविण्यात आले….
