मतदारांना जाहीर आवाहन ! निर्भयपणे मतदान करा – मतांचा बाजार करणाऱ्यांना यंदा घरी बसवा

लोणावळा : सर्व मतदार बंधू-भगिनींना विनम्र अभिवादन ! दोन डिसेंबर रोजी लोणावळा नगरपरिषदेचे सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदान हा संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. आपले मत हे अमूल्य आहे, त्याचे कोणतेही बाजार मूल्य करता येणार नाही. आपल्या शहराच्या, आपल्या प्रभागाच्या विकासासाठी विकासाची दृष्टी असलेला लोकप्रतिनिधी निवडून देणे हे प्रत्येक सजग मतदाराचे प्रथम कर्तव्य…

Read More

नांगरगाव, लोणावळा, वार्ड क्र. ५ निवडणुकीतील कायदेशीर वाद मिटला; भाजप उमेदवार सुभाष डेनकर यांचे नामांकन वैध

लोणावळा : नांगरगाव, लोणावळा येथील वार्ड क्र. ५ च्या बहुचर्चित निवडणुकीत (दिनांक २७ नोव्हेंबर २०२५) एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. वडगाव मावळ येथील जिल्हा न्यायालयाने भाजपचे उमेदवार सुभाष डेनकर यांनी दाखल केलेले नामांकन पूर्णपणे वैध ठरवले आहे. या संदर्भात, प्रतिस्पर्धी उमेदवार मुकेश परमार यांनी डेनकर यांच्या नामांकनाला आव्हान देत ते ‘शून्य व अवैध’…

Read More

माळवाडीमध्ये मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांनी दिला ठाम पाठिंबा

माळवाडी : जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटात इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या जनसंपर्क दौऱ्याला माळवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. ग्रामस्थांचे प्रेम, आदर आणि विश्वास पाहून मेघाताई भावुक झाल्या…

Read More

प्रचारसभेत सुरेखा जाधव यांचे वादग्रस्त विधान; ‘आमदारांचा बाप आमच्याकडे’ वक्तव्यामुळे मावळात खळबळ

“स्त्री असल्याचा फायदा घेत करतात टीका-नागरिकांमध्ये चर्चा लोणावळा | मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सध्या प्रचंड वेगाने वाहत आहेत. लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष विशेषतः लोणावळ्याकडे लागलेले असताना, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानांनी तालुक्यातील राजकारण अक्षरशः पेटवले आहे. भाजपच्या  चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत, सुरेखा जाधव यांनी…

Read More

लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद; नागरिकांचा उमेदवारांना दमदार पाठिंबा

लोणावळा : लोणावळा नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहीमेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आता शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार करत आहे. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश परमार, नगरसेविका पदाच्या उमेदवार वसुंधरा दुर्गे (प्रभाग क्र. ५) तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे यांनी नांगरगाव परिसरात नागरिकांची…

Read More

तरुणांना विकासाच्या वाटा दाखविण्याचे व महिलांना स्वावलंबी बनविण्याचे राजकारण करा – विजय पाळेकर

लोणावळा : निवडणूक आल्या की पैसा, दारू पार्ट्या असे प्रकार सुरू होतात. यामधून आपण काय साध्य करतोय.. राजकारण करायचे असेल तर ते विकासाचे करा.. तरुणांना विकासाच्या.. रोजगाराच्या वाटा दाखवा.. त्यांना व्यसनाधीन करू नका.. महिलांना स्वावलंबी बनवण्याचे राजकारण करा… केवळ निवडणुका डोळ्या समोर ठेऊन नाही तर कायम त्यांच्या सोबत रहा… असे आवाहन करताना कामगार नेते विजयराव…

Read More

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून आमदार सुनील शेळके पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा हातात घेतलेल्या आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्र. १३ मधील उमेदवारांच्या प्रचारदौर्यास नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र…

Read More

लोणावळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार धडाक्यात; नांगरगाव प्रभाग ५ मध्ये भव्य प्रचारफेरी

लोणावळा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जोरदार प्रचार मोहीम सुरू केली. प्रभाग क्रमांक ५ (नांगरगाव) आणि प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. राजेंद्र दिवेकर सर यांच्या प्रचारफेरीचा शुभारंभ नांगरगाव येथील दत्त मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. ​यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ…

Read More

काले-कुसगांव गटात ज्ञानेश्वर दळवी यांची जोरदार मोर्चेबांधणी !

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर दळवी यांची उमेदवारी निश्चित होण्याची चिन्हे भाजपाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांची जोरदार मोर्चेबांधणी, कार्यकर्त्यांचेही पाठबळ पवनानगर, दि. २० (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यात काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने येथे मोठी चुरस पाहायला मिळेल. अशात या गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा…

Read More

इंदोरी गावचे मानवतेचं पाऊल! मेघाताई भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त १०६ जणांनी केले रक्तदान; गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा.

इंदोरी (ता. मावळ) : सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकल मराठा समाज मावळ तालुका व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने इंदोरी गावातील हनुमान मंदिर हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. समाजसेवेची प्रेरणा व…

Read More