नवलाख उंब्रे: मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा झंझावाती दौरा सुरू आहे. गावोगावी त्यांना नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीदरम्यान, वडीलधारी मंडळी आणि माता-भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला ताकद देऊ,” असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. जनतेच्या या प्रेमळ प्रतिसादामुळे मेघाताई स्वतः भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “जनतेचं हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. या ऊर्जा आणि आशीर्वादाच्या बळावर मी अधिक जोमाने आणि निष्ठापूर्वक काम करीन.”

गावागावांत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांच्यासाठी एक अत्यंत अनुकूल आणि उत्साही वातावरण तयार होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
निवडणुकीच्या तयारीत त्या ज्या पद्धतीने थेट जनतेच्या मनात घर करत आहेत, त्यावरून इंदोरी-वराळे गटात यंदा मेघाताई भागवत यांचा प्रभाव अत्यंत ठळकपणे जाणवेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.


