राजपुरीमध्ये ‘मनोरंजन संध्या 2025’ चा भव्य सोहळा; प्रशांत दादा भागवतांच्या नेतृत्वाने महिलावर्ग भारावला

राजपुरी: आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रेरणेने आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने आयोजित ‘मनोरंजन संध्या 2025’ या कार्यक्रमाला राजपुरीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिलावर्गाची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये स्नेह, आनंद आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियंका संदीप चव्हाण, द्वितीय क्रमांक प्रियंका जगताप, तर तृतीय क्रमांक सानिका आदिनाथ लंके यांना मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, मनोरंजक स्पर्धा आणि विनोदी कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे प्रशांत दादा भागवत यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही आपले स्थान निर्माण केले आहे. ‘मनोरंजनासोबत समाजजागृती’ हा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमातून प्रशांत दादांची लोकाभिमुख कार्यपद्धती दिसून आली.

कार्यक्रमाच्या वेळी राजपुरी येथील भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 51 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. या कार्यक्रमाला नारायण शिंदे, प्रदीप बनसोडे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, भगवान शिंदे, किसनराव शिंदे, संतोष वंजारी, बाबाजी शिंदे, आदिक शिंदे, छगन लंके, अंकुश वाघमारे, संदीप चव्हाण, मयूर शिंदे, राहुल लोंढे, पूनम सागर शिंदे, प्रीती सोमनाथ लंके, मयुरी पाटोरे, विद्या ठोमसे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या भव्य सोहळ्यानंतर परिसरात अशी चर्चा सुरू झाली आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशांत दादा भागवत हेच सक्षम आणि विश्वसनीय उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाने मावळातील महिलावर्ग, तरुण आणि ग्रामस्थांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *