मावळ : मावळ तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कार्यरत असलेले प्रशांत दादा भागवत यांनी नुकतीच बधलवाडी आणि मिंढेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या भेटीमुळे लोकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला, कारण भागवतांनी फक्त मंडळांना भेट दिली नाही, तर गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या थेट संवादामुळे आणि गावोगावी वाढलेल्या उपस्थितीमुळे त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास वाढलेला स्पष्टपणे दिसतो.

ग्रामस्थांच्या मते, प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक इच्छुक उमेदवार आहेत आणि अशा उत्स्फूर्त स्वागतामुळे त्यांना निवडणुकीत नक्कीच मोठा फायदा होईल.
यावेळी अंकुश बधाले, बळीराम मराठे, सुरेश भोसले, रामनाथ बधाले, दत्तात्रय पडवळ, प्रेमराज मिंडे, सोमनाथ पडवळ, निलेश शेवकर, पप्पू डिंबळे, रवी कडलक, लहू बधाले, राहुल भागवत, संतोष मराठे यांसारखे अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


