तुंगार्ली, दि. १०: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत, प्रभाग क्रमांक २, तुंगार्ली येथून नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सौ. दीपिका इंगुळकर यांच्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सौ. दीपिकाताई या सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. विजय इंगुळकर यांच्या पत्नी असून, विजय इंगुळकर यांनी अनेक वर्षे सामाजिक मंडळांमधून निस्वार्थपणे काम केले आहे. हाच सामाजिक वारसा आणि गावातील समस्यांची सखोल जाण घेऊन त्यांच्या सहचारिणी दीपिकाताई मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या माहेरमध्ये त्यांचे वडील ग्रामपंचायत सदस्य होते, तर बंधू विद्यमान एकविरा देवी देवस्थानचे विश्वस्त आहेत. यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक नात्यांची खोल जाण आहे.
तुंगार्ली प्रभाग क्रमांक २ मधील रहिवाशांच्या समस्या व गरजा जाणून घेण्यावर दीपिकाताईंनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी त्यांच्या शिक्षण, आरोग्य सुविधा आणि महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यांच्या या सक्रिय जनसंवादामुळे तुंगार्लीतील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
विजय विजय इंगुळकर यांच्या निस्वार्थ कार्याला मिळणारी गावकऱ्यांची कृतज्ञता आणि सौ. दीपिकाताईंची कर्तृत्ववान प्रतिमा, यामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

