मावळच्या ‘आजीवली’ शाळेचा पर्यावरणाबद्दल सन्मान; गावकऱ्यांसाठी आदर्श ठरली शाळा
मावळ (तालुका प्रतिनिधी):पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आजीवलीचा नुकताच Environment Conservation Association (ECA) तर्फे गौरव करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शाळेला हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे शाळेसह संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. आजीवली शाळेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शिक्षक…
