कुंकुमार्चन सोहळ्यातून राजकीय संदेश; आमदार सुनील शेळके यांची प्रशांत भागवत यांना भक्कम साथ
मावळ: शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील राजकारण एका नव्या वळणावर आले आहे. प्रशांत भागवत युवा मंचतर्फे आयोजित कुंकुमार्चन सोहळा केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. या सोहळ्याला हजारो महिलांची उपस्थिती होती आणि त्याचवेळी आमदार सुनील शेळके यांनी प्रशांत भागवत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले. कार्यक्रमात देवीसमोर साकडं घालताना आमदार शेळके यांनी, “प्रशांत…
