कामशेत येथे गांजा विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून गजाआड
कामशेत : कामशेत परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १८०० ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत २७,००० रुपये आहे, जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा विभागातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवनानगर रोडवर एक संशयित…
