लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी विशाल पाडाळे यांची नियुक्ती
लोणावळा: लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील वलवण येथे असलेल्या नामांकित लोणावळा महाविद्यालयाची जबाबदारी हा ट्रस्ट सांभाळते. या महाविद्यालयात सध्या १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये ज्युनिअर कॉलेजपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत….
