लोणावळा: मावळ वार्ता फाउंडेशनची बैठक ११ सप्टेंबर रोजी श्री शितला माता मंदिर, गावठाण येथे पार पडली. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ‘मेगा फायनल कॉम्पिटिशन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फाउंडेशन दरवर्षी २६ जानेवारी, गोकुळाष्टमी आणि नवरात्रीसारखे विविध कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करत असते. याच परंपरेनुसार, यंदाही नवरात्रीच्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या वर्षीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री आशिष बुटाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच आशिष बुटाला हे विविध सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल मावळ वार्ता फाउंडेशनने त्यांचे अभिनंदन केले आहे.

