लोणावळ्यात रविवारी ‘मोफत महा मेडिकल शिबिर’; तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार विविध आजारांची मोफत तपासणी

लोणावळा: लोणावळ्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने श्री नारायणी सेवा संस्थान आणि श्री नारायणी नारी चेतना केंद्र, लोणावळा यांच्या वतीने एका भव्य ‘मोफत महा मेडिकल शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

​विविध आजारांवर मोफत उपचार व औषधे

​या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या रुग्णांची केवळ तपासणीच केली जाणार नाही, तर त्यांना आवश्यक ती औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत.

शिबिरात खालील तज्ज्ञांकडून तपासणी उपलब्ध असेल:
​त्वचारोग, हृदयरोग आणि स्त्रीरोग तपासणी
​दंतरोग, नाक-कान-घसा आणि नेत्ररोग तपासणी
​थायरॉईड, मधुमेह (डायबिटीज) आणि कर्कशोग (कॅन्सर) तपासणी
​अस्थिरोग (हाडांचे विकार), बालरोग आणि जनरल तपासणी

​नोंदणी आणि स्थळ
​शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया शनिवार, दिनांक २१ मार्च २०२६ च्या संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत:
📞 ९२२५५१९३१२ / ९८२२४९५१०६

​शिबिराचे स्थळ:
श्री मधुसुदन झुनझुनवाला हेल्थ केअर सेंटर,
श्री नारायणी धाम शेजारी, तुंगार्ली, लोणावळा.

​महत्त्वाची सूचना
​संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना आपले जुने केस पेपर (Medical Reports) सोबत आणावेत, जेणेकरून डॉक्टरांना निदानासाठी मदत होईल. लोणावळा आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *