जिल्हा परिषद निवडणूक इंदोरी–वराळे गटात जोरदार वातावरण निर्माण झाले असून इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इंदोरी गावठाण भागातील भेटीदरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे मनापासून स्वागत करत प्रामाणिक शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. नागरिकांचा हा ओघ, मोठ्या प्रेमाचा वर्षाव पाहून मेघाताई स्वतः भारावून गेल्या असून या पाठिंब्याने त्यांना लढण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून महिला, शेतकरी, आंगणवाडीसेविका, वृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या प्रभागात अनेक महत्त्वाचे उपक्रम, शिबिरे, सामाजिक कार्यक्रम, आरोग्य उपक्रम आणि विकासकामे राबवली गेल्याचा ठसा नागरिकांच्या मनावर आहे. प्रत्येक वाडी–वस्तीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे मार्गदर्शन करणे आणि त्वरित उपाययोजना घडवून आणणे ही त्यांची कामाची पद्धत असल्याने गटात त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

याच सक्रिय जनसंपर्कामुळे मेघाताई भागवत यांना या निवडणुकीत “पार्ट जड” झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गावोगाव उमटणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा ठाम पाठिंबा, तरुणांचा विश्वास आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद यामुळे या गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाचे तिकीटही त्यांच्या मजबूत जनाधारामुळे निश्चित होईल, अशी जोरदार चर्चा स्थानिकांमधून होताना दिसत आहे.
इंदोरी–वराळे गटातील नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि मेघाताई भागवत यांची लोकांशी असलेली जवळीक पाहता या निवडणुकीत त्या एक मजबूत आणि प्रभावी दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




