इंदोरी: इंदोरी, वराळे, आंबी, वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार प्रशांत भागवत यांचे गावागावांत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेले होते.

या दौऱ्यावेळी, महिलांनी जागोजागी रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत केले. तसेच, तरुणांनी ‘प्रशांत दादा भागवत यांचा विजय असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी संतोष जांभुळकर, रवी कडलक, नवनाथ पडवळ, अतुल मराठे, शशिकांत शिंदे, कल्पेश मराठे, प्रवीण वारिंगे, गौरव लोंढे, भरत घोजगे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, निलेश लोंढे, बाबासाहेब मखामले, बाळासाहेब मखामले, स्वप्निल भुजबळ, शरद भोंगाडे, संतोष मराठे, शिवा मराठे आणि संजय मखामले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गावकऱ्यांनी प्रशांत भागवत यांच्यावर विश्वास व्यक्त करत ‘गावाच्या विकासासाठी दादा एक विश्वासार्ह नेतृत्व आहेत,’ असे सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले प्रशांत भागवत यांना मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद त्यांची लोकप्रियता आणि लोकांच्या अपेक्षा दर्शवतो. या दौऱ्यातील उत्साह, नागरिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्यावरील विश्वास पाहता या निवडणुकीत एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

