दिलेला शब्द पूर्ण करणारे हक्काचे नेतृत्व – मेघाताई प्रशांतदादा भागवत
नवलाख उंब्रे गावातील ठाकर वस्ती, रामवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्यासमोर ठाकर वस्तीतील महिला भगिनींनी एक अत्यंत महत्त्वाची व जिव्हाळ्याची समस्या मांडली. वस्तीमध्ये शौचालय नसणे, तसेच जी शौचालये आहेत ती बंद पडलेली असल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आणि “आमच्या वस्तीत शौचालय बांधून द्या” अशी थेट मागणी केली. या मागणीची गंभीरता ओळखून मेघाताईंनी कोणतीही टाळाटाळ न करता तात्काळ प्रशांतदादा भागवत यांच्याशी चर्चा करून दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
ठाकर वस्तीतील नागरिक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, पडक्या घरांमध्ये राहत असून शेळ्या–मेंढ्यांवर उपजीविका करणारा हा समाज आहे. अशा दुर्लक्षित घटकांसाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून मेघाताई व प्रशांतदादा भागवत यांनी अत्यंत दर्जेदार, स्वच्छ आणि मजबूत शौचालये मोफत बांधून दिली. शौचालय उभारणी पूर्ण होताच वस्तीतील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाशी जोडलेला हा प्रश्न सोडवल्यामुळे मेघाताईंच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी नवनाथ पडवळ, तानाजी पडवळ, अंतुभाऊ शेटे, नवनाथ सांवत, मच्छिंद्र शेटे, बाळासाहेब पारधी, संजय जगनाडे, मोहिनी ताई कलावडे, शोभा ताई शिर्के, स्वाती ताई पापल, पूनम ताई पडवळ, सुमन ताई शिर्के, आनंदीबाई वाळुंज, शिल्पा ताई विक्रम कदम, पूनम तानाजी पडवळ, कल्पना जाधव, अल्काबाई कार्ले, शुभांगी कदम, सुरेखा जाधव, मनीषा खंडागळे, सविता मेंगळे, कल्पना मेंगळे, बाबाबाई जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेघाताई प्रशांत भागवत या जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटातून इच्छुक उमेदवार असून, कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्या सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. दिलेला शब्द कृतीतून पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे. महिलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी असलेला थेट संवाद, तळागाळातील प्रश्नांची जाण आणि तत्काळ निर्णयक्षम कार्यशैली यामुळेच त्या या गटातील प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. ठाकर वस्तीतील शौचालय उभारणीसारखी मोठी समस्या सोडवल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी या गटात मेघाताई भागवत यांची निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



