लोणावळा: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक शिवरत्न विर जिवाजी महाले यांची ३९० वी जयंती श्री संत सेना महाराज नाभिक संघटना लोणावळा खंडाळा ग्रामीण परिसर यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष श्री सागर पवार यांनी जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी छत्रपतींच्या या पराक्रमी मावळ्याच्या शौर्याला व योगदानाला वंदन करण्यात आले.
ह.भ.प. राऊत गुरुजींचे व्याख्यान:
याप्रसंगी ह.भ.प. राऊत गुरुजी यांनी जिवाजी महाले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित सखोल व्याख्यान दिले. त्यांनी विशेषतः प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचे नाट्यमय वर्णन केले. या प्रसंगी जिवाजी महाले यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व पराक्रमामुळे महाराजांचे प्राण वाचले, या ऐतिहासिक घटनेवर त्यांनी प्रकाश टाकला. ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या वाक्यातील वीर जिवाजी महाले यांचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.
सागर पवारांनी वाहिली आदरांजली:
संघटनेचे अध्यक्ष श्री सागर पवार यांनीही शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले यांनी बजावलेली भूमिका, त्यांचे महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा यावर भाष्य केले आणि त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली.
पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उपाध्यक्ष श्री संदिप निंबोकार, श्री विजय राऊत, खजिनदार श्री कृष्णा लापुरकर, सेक्रेटरी श्री राजू दळवी, सल्लागार श्री मोहन क्षीरसागर, श्री हनुमंत राऊत, तसेच माजी अध्यक्ष श्री दिलीप दळवी, श्री बाळासाहेब पवार, श्री सुनील दळवी, आणि सदस्य श्री जाकिर खलिफा, श्री धनसिंग सोनार, श्री रविंद्र जगताप आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थितांनी जिवाजी महाले यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

