लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या निधीतून करण्यात येणाऱ्या प्रमुख कामांचा तपशील:
- नागरगाव येथे व्यायाम शाळा बांधणे – २० लक्ष
- नागरगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे – ६० लक्ष
- रामनगर येथे महिला मंडळ सभागृह व व्यायाम शाळा बांधणे – २० लक्ष
- खंडाळा येथे व्यायाम शाळा बांधणे – २० लक्ष
- खंडाळा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे – २० लक्ष
या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ही विकासकामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या भूमिपूजन समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मा. नगरसेविका कल्पना आखाडे, मा. नगरसेविका सिंधू परदेशी, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, उपशहर प्रमुख मंगेश येवले, उपशहर प्रमुख विजय आखाडे, मा. उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, मा. नगरसेवक जीवन गायकवाड, मा. नगरसेवक ब्रिंदा गणात्रा, मा. नगरसेविका पूजाताई गायकवाड, मा. नगरसेविका रचना सिनकर, मा. नगरसेविका रंजना दुर्गे, रामभाऊ दुर्गे, युवासेना अध्यक्ष विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपशहर प्रमुख विनायक शिंदे, विभाग प्रमुख प्रसाद कन्नन, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रिया पवार, उपशहर संघटिका अनिता गायकवाड, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, आशिष बुटाला, विभाग प्रमुख सहादू बडेकर, उपविभाग प्रमुख परेश वावळे, सोशल मीडिया प्रमुख यशोधन शिंगरे, युवासेना उपाध्यक्ष सुधांशु शेलार, उपाध्यक्ष आतिष भांगरे, प्रशांत जाधव, मारुती जाधव, उल्हास भांगरे, सुशील पायगुडे, छगन ठाकर, गणेश वाडकर, अशोक गवारणे, दिलीप गायकवाड, बलकवडे सर, अर्जुन पाठारे, सुभाष डेनकर, रोहित भांगरे यांच्यासह खंडाळा, रामनगर व नागरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

