मावळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवरून भाजप सोशल मीडियाचा प्रशासनाला इशारा
मावळ: मावळ तालुक्यात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याव्यतिरिक्त, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल दाखले मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त आहेत. या गंभीर समस्यांवरून भाजप सोशल मीडिया मावळ तालुक्याने प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन…
