Sahyadridarpan

प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या ‘मनोरंजन संध्ये’ला वराळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले ‘पोषक वातावरण’

वराळे: प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम नुकताच वराळे येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे मावळात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Zilla Parishad Election)…

Read More

धक्कातंत्र! लोणावळ्याचे नगराध्यक्षपद ‘अनुसूचित जाती’ साठी आरक्षित; खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचे स्वप्न भंगले

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या राजकारणात मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील (Open Category) अनेक इच्छुकांचे स्वप्न आज सोमवारी एका झटक्यात भंगले आहे. कारण, मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित झाले आहे. या आरक्षणामुळे लोणावळ्याच्या राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे…

Read More

तळेगाव-चाकण महामार्गावरील खड्डेविरोधी आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात तळेगावकर नागरिक अखेर रस्त्यावर उतरले असून, त्यांनी मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक गंभीर अपघात झाले असून, त्यात निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. वारंवार तक्रारी…

Read More

लोणावळा महाविद्यालयात ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवन आणि राष्ट्रीय सेवा योजना (+2) यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम वनविभाग पुणे वनपरिक्षेत्र, शिरोता यांच्या सहकार्याने वन्यजीव जनजागृती व…

Read More

लोणावळा महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व्याख्यानाचे आयोजन

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (+2) विभागाच्या वतीने नुकतेच ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एका महत्त्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरील सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला खंडाळा महामार्ग विभागाचे वाहतूक निरीक्षक भीमसेन शिखरे आणि त्यांचे सहकारी…

Read More

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा सहाय्यक उपनिरीक्षक २० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

लोणावळा: लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शकील मोहम्मद शेख (वय ४५), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (तपासी अधिकारी), लोणावळा शहर पोलीस स्टेशन, यांनी एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडे लोणावळा शहर…

Read More

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी विशाल पाडाळे यांची नियुक्ती

लोणावळा: लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील वलवण येथे असलेल्या नामांकित लोणावळा महाविद्यालयाची जबाबदारी हा ट्रस्ट सांभाळते. या महाविद्यालयात सध्या १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये ज्युनिअर कॉलेजपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत….

Read More

कुंकुमार्चन सोहळ्यातून राजकीय संदेश; आमदार सुनील शेळके यांची प्रशांत भागवत यांना भक्कम साथ

मावळ: शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील राजकारण एका नव्या वळणावर आले आहे. प्रशांत भागवत युवा मंचतर्फे आयोजित कुंकुमार्चन सोहळा केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. या सोहळ्याला हजारो महिलांची उपस्थिती होती आणि त्याचवेळी आमदार सुनील शेळके यांनी प्रशांत भागवत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले. कार्यक्रमात देवीसमोर साकडं घालताना आमदार शेळके यांनी, “प्रशांत…

Read More

सौभाग्य, सुख आणि समृद्धीसाठी महिलांचा अभूतपूर्व भक्तिभाव; मावळात पारंपारिक कुंकुमार्चन सोहळ्याने सांस्कृतिक ऐक्याचा संदेश – प्रशांत भागवत युवा मंचच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

इंदोरी, मावळ: शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमीनिमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी येथे प्रथमच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला तालुक्यातील विविध भागांतून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ​या सोहळ्यातील मुख्य आकर्षण होते कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. त्यासोबतच शाहीर हरिदासजी शिंदे…

Read More

सायली बोत्रे यांची महिला मोर्चा तर गणेश धानिवले यांची अनुसूचित जमाती मोर्चा भाजप जिल्हा अध्यक्षपदी निवड

लोणावळा : मावळ तालुक्यातील वेहेरगाव येथील भाजप नेत्या सायली जितेंद्र बोत्रे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे लोहगड येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश उर्फ तात्यासाहेब बबन धानिवले यांची पुणे जिल्हा (उत्तर) भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी नुकत्याच…

Read More