काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची चर्चा !
पवनानगर, दि. ५ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ते अलीकडेच दौऱ्यावर असून, ग्रामस्थांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी त्यांनी सावंतवाडी, प्रभाचीवाडी, काले आदी गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, महिला व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत…
