Sahyadridarpan

लोणावळ्यात राष्ट्रवादीची ‘दहा हजार प्लस’ची घोषणा! नगराध्यक्ष प्रचंड मतांनी विजयी होतील – आमदार सुनील शेळके

लोणावळा: आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाबद्दल अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल,’ असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाच्या जोरावर व्यक्त केला. ‘विकासपुरुष’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदार शेळके यांनी मावळ तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे हा आत्मविश्वास वाढला आहे. लोणावळ्यात…

Read More

काले-कुसगाव गटात दळवी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा

माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता काले गणासह कुसगांव गणातील दांडगा जनसंपर्क ठरतोय जमेची बाजू वरिष्ठांचा विश्वास अन् कार्यकर्त्यांचे पाठबळ घेऊन माऊली दळवी जिल्हा परिषद लढण्यासाठी सज्ज पवनानगर, दि. १७ (प्रतिनिधी) : काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे सक्षम उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी हे अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता…

Read More

ज्ञानेश्वर दळवी यांची बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक : धरणग्रस्तांसाठी पुन्हा लढा उभारण्याचा निर्धार

जलसिंचन उपविभागाच्या कारवाईला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ज्ञानेश्वर दळवी मैदानात पवनानगर, दि. १३ (प्रतिनिधी) : पवना धरण जलाशय हद्दीत असलेल्या अतिक्रमण विरोधात जलसिंचन उपविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सामान्य धरणग्रस्त शेतकरी भरडला जाण्याची भीती निर्माण झाली असून या बाधीत शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा साधन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. याबाबत माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी आक्रमक…

Read More

“मेघाताई भागवतांना वारकऱ्यांचा प्रेमळ आशीर्वाद; सोहळ्यात उसळली भक्तीची लाट”

आमणे–लोनाड पालखी सोहळा २०२५ पर्व ४ थे भक्तीरसात रंगला आमणे–लोनाड परिसर वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय रंगाने अक्षरशः दुमदुमला. पायी पालखी सोहळा २०२५ चे पर्व ४ थे भक्तीसात्विक उत्साहात, भावविभोर वातावरणात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले. सालाबादप्रमाणे यंदाही परंपरेचे पालन करत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कीर्तन सोहळ्याला नागरिकांनी उसळत्या गर्दीचा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रशांत पेट्रोलियम…

Read More

वाघेश्वर गावातून तीर्थक्षेत्र आळंदी येथे निघालेल्या पालखी व पायी दिंडीचे ज्ञानेश्वर दळवी यांनी केले उत्साहात स्वागत

पवन मावळ विभागातील वारकऱ्यांची हि दिंडी म्हणजे या विभागाचे सांस्कृतिक वैभव आहे – ज्ञानेश्वर दळवी पवनानगर ( प्रतिनिधी ) : पवन मावळ विभागातील ऐतिहासिक वाघेश्वर गावातून श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अर्थात आळंदी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याचे आणि पायी दिंडीतील वारकऱ्यांचे माजी सभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांनी कोथुर्णे गावात…

Read More

सामाजिक वारसा घेऊन दीपिकाताई इंगुळकर मैदानात; तुंगार्ली प्रभाग क्र. २ मध्ये सकारात्मक वातावरण

तुंगार्ली, दि. १०: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत, प्रभाग क्रमांक २, तुंगार्ली येथून नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सौ. दीपिका इंगुळकर यांच्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सौ. दीपिकाताई या सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. विजय इंगुळकर यांच्या पत्नी असून, विजय इंगुळकर यांनी अनेक वर्षे सामाजिक मंडळांमधून निस्वार्थपणे काम केले आहे. हाच सामाजिक वारसा आणि…

Read More

जयप्रकाश परदेशी यांची पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्षपदी फेरनिवड!

लोणावळा : भारतीय जनता पक्षाचे (BJP) लोणावळा येथील अत्यंत सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते श्री. जयप्रकाश शंकर परदेशी यांची पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे लोणावळा परिसर आणि ग्रामीण भागातील भाजपच्या पक्षसंघटना कार्यास नवी बळकटी मिळणार आहे. जमिनीवरील कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे श्री. परदेशी हे केवळ सक्रियच नाहीत, तर…

Read More

काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘माऊली’ दळवी यांचा झंझावात; जनसंपर्कातून मिळतोय मोठा पाठिंबा

पवनानगर, दि. ९ (प्रतिनिधी) : राज्यात लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गट सध्या जोरदार चर्चेत आहे. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) निष्ठावंत कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांच्या उमेदवारीच्या संभाव्यतेमुळे गटात सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवन मावळ विभागातील जुने…

Read More

कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील कोल्हापूर-आदमापूर तीर्थयात्रेचे आयोजन! महिलांसाठी खास संधी!

लोणावळा : कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी एक विशेष धार्मिक तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता ही यात्रा श्री महालक्ष्मी माता (कोल्हापूर) आणि श्री बाळूमामा दर्शन (आदमापूर) या दोन महत्त्वाच्या पवित्र स्थळांसाठी प्रस्थान करणार आहे. ​यात्रेचे आयोजक आणि कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे यांचे…

Read More

इंदोरी–वराळे गणातून मेघाताई भागवत यांचा जोरदार प्रचार सुरू – नागरिकांच्या गाठीभेटींवर भर

मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी गोळेवाडी परिसरात झालेल्या भेटीगाठी दरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी प्रेमाने शुभेच्छा देत “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादाने परिसरातील वातावरण उत्साही झाले आहे. मेघाताई…

Read More