Sahyadridarpan

गावागावात गणपती मंडळ भेटीचा आनंदोत्सव, प्रशांत भागवत यांचे उत्साहात स्वागत

इंदोरी: इंदोरी, वराळे, आंबी, वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार प्रशांत भागवत यांचे गावागावांत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेले होते. या दौऱ्यावेळी, महिलांनी जागोजागी रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत…

Read More

वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादांना उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेश मंडळांच्या भेटीमुळे वातावरण उत्साही

इंदोरी: मावळ तालुक्यातील राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या गावांतील गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचासह प्रशांत दादांनी या गावांमधील तरुणांशी संवाद…

Read More

सांगवीत ग्रामविकासाच्या दिशेने एक पाऊल: समस्त ग्रामस्थ सांगवी आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या 2025’ चा धुमधडाका

सांगवी: समस्त ग्रामस्थ सांगवी आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच “मनोरंजन संध्या २०२५” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली. या कार्यक्रमामध्ये पारंपरिक उखाणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, गमतीशीर खेळ, विचित्र हास्य स्पर्धा, तसेच गप्पागोष्टी आणि धमाल स्पर्धांचे आयोजन…

Read More

‘आमची गौराई… आमचा अभिमान!’ घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदोरी-वराळे गट गजबजला; विजेत्यांना फ्रिज, वॉशिंग मशीनसह आकर्षक बक्षिसे इंदोरी : गणेशोत्सव आणि गौरीपूजन या पारंपरिक सणांना आधुनिकतेची जोड देत, प्रशांतदादा भागवत युवा मंचातर्फे इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातर्फे ‘आमची गौराई… आमचा अभिमान!’ ही अनोखी घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गावागावांत सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी…

Read More

डॉ. बी. एन. पुरंदरे महाविद्यालयात ‘रोबोटिक्स’ कार्यशाळा

लोणावळा : येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाने ग्लोबल इन्फोटेक लोणावळा आणि रोबोकीड्झ पुणे यांच्या सहकार्याने ‘रोबोटिक्स आणि ए.आय.’ या विषयावर दोन दिवसीय आंतरशालेय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत लोणावळ्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत रोबोकीड्झ पुणे…

Read More

प्रशांत दादा भागवत यांच्या गणेशोत्सव भेटी दौऱ्याला नऊलाख उंब्रे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नऊलाख उंब्रे (मावळ):आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली नऊलाख उंब्रे गावातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यात आली. या भेटी दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी, महिलांनी व युवकांनी दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्यात विशेष आकर्षण ठरले ते कांगाई तरुण मंडळाचे साकडे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या चरणी प्रशांत दादांच्या…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या वादळाला लोणावळ्यातून पाठिंबा; टॅक्सी असोसिएशन धावली मदतीला!

लोणावळा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाखो मराठा बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. याच धडकेत लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशननेही आपली सामाजिक बांधिलकी दाखवत पुढं सरावली आहे. गुरुवारी सकाळपासूनच मुंबई-पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांचा महासागर मुंबईकडे कूच करत आहे. मिळेल त्या वाहनाने निघालेल्या या योद्ध्यांना प्रवासात कुठलीही गैरसोय…

Read More

लोणावळा शहरात गणपती अगमन सोहळा मोठ्या उत्साहात

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात काल मंगळवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. लोणावळा शहरात सातत्याने पडणाऱ्या पावसाने सकाळच्या सत्रात थोडी उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ढोल, ताशे यांच्या गाजरात घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाणारे कार्यकर्ते दुपारी जेव्हा आपल्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणायला बाहेर पडले, तेव्हा मात्र त्यांना पुन्हा…

Read More

लोणावळ्यात ‘वंदे मातरम १५०’ चा भव्य कार्यक्रम, स्वातंत्र्य मंत्राच्या गाथेला उजाळा

लोणावळा : ‘वंदे मातरम’ या स्वातंत्र्य मंत्राच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘शिवसेवा प्रतिष्ठान’ने लोणावळ्यात ‘वंदे मातरम १५०’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसातही लोणावळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला डॉक्टर, वकील, व्यावसायिक, तसेच बापूसाहेब भोंडे हायस्कूल, डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय आणि व्ही….

Read More

भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाची नवी ‘जंबो’ कार्यकारणी जाहीर

लोणावळा – भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाची नवी ‘जंबो’ कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष अनिल उर्फ अनंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या मोठ्या निवडीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव…

Read More