इंदोरी-वराळे गट गजबजला; विजेत्यांना फ्रिज, वॉशिंग मशीनसह आकर्षक बक्षिसे
इंदोरी : गणेशोत्सव आणि गौरीपूजन या पारंपरिक सणांना आधुनिकतेची जोड देत, प्रशांतदादा भागवत युवा मंचातर्फे इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातर्फे ‘आमची गौराई… आमचा अभिमान!’ ही अनोखी घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गावागावांत सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी मिळाली आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षिसे
या स्पर्धेत विजेत्यांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रिज, द्वितीय क्रमांकासाठी पिठाची गिरणी, तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकासाठी फूड प्रोसेसर आणि पाचव्या क्रमांकासाठी स्मार्टफोन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, सहभागी स्पर्धकांसाठी गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री अशा प्रकारची प्रोत्साहनपर बक्षिसेदेखील ठेवण्यात आली आहेत.
नियम आणि सहभागासाठी अटी
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा केवळ इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील गावांपुरती मर्यादित असेल आणि ती १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२५ या काळात पार पडेल. स्पर्धकांना त्यांच्या सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ 9090991020 या मोबाईल क्रमांकावर पाठवावे लागतील किंवा दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागेल. तसेच, स्पर्धकांनी हे फोटो व व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करून Prashant Bhagwat (prashantbhagwatofficial) या अधिकृत पेजला टॅग करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा निकाल ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाइन पद्धतीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहीर केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
स्पर्धेत सहभागी होणारी गावे
माळवाडी, तळेगाव (ग्रा.), नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिढेवाडी, सुदवडी, सुदुंबरे, आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी, राजपुरी, सांगवी, नानोली, वराळे, मोहितेवाडी, साते, बाम्हणवाडी, जांभुळ, इंदोरी, जांबवडे या गावांमधील नागरिक या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.
या उपक्रमाविषयी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार प्रशांतदादा भागवत यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा एकता, श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा सण आहे. या स्पर्धेमुळे घरोघरी असलेली कला आणि भक्तीभाव दिसून येईल. प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, अशी माझी अपेक्षा आहे.”

