लोणावळा: माजी नगरसेवक आणि संघटनेचे सल्लागार निखिल कवीश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने अविनाश तिकोने यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर धनेश हुंडारे यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे संजय मावकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर अविनाश तिकोने यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अविनाश तिकोने मागील दोन वर्षांपासून संघटनेचे खजिनदार म्हणून कार्यरत होते.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झालेले अविनाश तिकोने आणि धनेश हुंडारे हे दोघेही संघटनेमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. संघटनेच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून ते सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश तिकोने यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच पदाधिकाऱ्यांची पूर्ण कमिटी जाहीर केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
