लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक धनराज पाटील यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. ही गौरवपूर्ण कामगिरी लोणावळा शहरासाठी आणि महाविद्यालयासाठी एक अभिमानाचा क्षण ठरली आहे.

कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशन इंडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. दीपक आर्वे यांच्या हस्ते प्रा. पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध लेखक सचिन वायकुळे, आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय पवार, तसेच श्री. जब्बार शिकलगार, श्री. ए. बी. शेख, श्रीमती सुनिता केदार आणि संस्थेचे पदाधिकारी, पुरस्कारार्थी व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. पाटील यांच्या या यशाबद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र नैय्यर, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, सचिव ॲडव्होकेट नीलिमा खिरे, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, विश्वस्त श्री. नंदकुमार वाळंज, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. विशाल पाडळे, डॉ. दिगंबर दरेकर, कनिष्ठ विभाग प्रमुख वर्गीस मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

