लोणावळा : लोणावळ्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस (SIPS) ने राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करून शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. नुकत्याच झालेल्या चेतना फाऊंडेशनच्या ‘डिजिटल डिटॉक्स महोत्सवा’ मध्ये SIPS च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रहसन (नुक्कड नाटक) स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले.
या प्रतिष्ठित महोत्सवात देशभरातील २५५ हून अधिक नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अशा अटीतटीच्या स्पर्धेत मिळवलेले हे यश खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

ही नेत्रदीपक कामगिरी प्राचार्य डॉ. आर. आर. पिंजारी यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे, समन्वयक श्री. सतीश मेंडके यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि SIPS च्या प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे साध्य झाली.
हे यश केवळ सिंहगड इन्स्टिट्यूटसाठीच नव्हे, तर संपूर्ण लोणावळा शहरासाठी एक अभिमानास्पद क्षण बनले आहे, ज्यामुळे या परिसराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळून निघाले आहे.

