साते, मावळ: मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी (साते) येथे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत दादा भागवत युवा मंचातर्फे आयोजित ‘मनोरंजन संध्या २०२५’ या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गावागावातील महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या स्पर्धेमध्ये पुष्पलता बोऱ्हाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर माधुरी नवघणे आणि रेखा विनोदे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पाताई घोजगे, माजी सरपंच वर्षाताई नवघणे, माजी उपसरपंच संध्याताई शेळके, वंदना शिंदे, अश्विनी विनोदे, कविता विनोदे, विद्या शेवकर, सोनल सूर्यवंशी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महिलांचा पाठिंबा
कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रशांत दादा भागवत यांनी नेहमीच गावागावातील महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळ भागातील महिलांची एकजूट दिसून आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचा हा पाठिंबाच प्रशांत दादा भागवत यांच्या विजयाचे मुख्य बळ ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमामुळे प्रशांत भागवत यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.






