लोणावळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार लोणावळा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीची घोषणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लोणावळा शहरातील नवीन कार्यकारिणीची घोषणा मान्यवरांच्या हस्ते पत्रक वाटप करून करण्यात आली. यावेळी लोणावळ्यातील ज्येष्ठ शिवसैनिक मारुती खोले यांची पुणे जिल्हा सल्लागारपदी तर बबनराव अनसुलकर यांची मावळ तालुका सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
लोणावळा शहर कार्यकारिणीतील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती लोणावळा शहरप्रमुख श्री. परेश परशुराम बेडेकर यांनी सुचवल्याप्रमाणे झाली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे आणि पदे खालीलप्रमाणे आहेत:
- शाम उत्तम सुतार: शिवसेना संघटक, लोणावळा शहर
- जयवंत दळवी: समन्वयक, लोणावळा शहर
- आनील कडु: प्रसिद्धी प्रमुख
- उपशहरप्रमुख, लोणावळा शहर:
* संजय शिंदे (वलवन, रेल्वे विभाग, जिजामाता नगर)
* सुरेश टाकवे (भुशी, रामनगर)
* अशोक गवारने (खंडाळा विभाग)
* शेखर कारके (खोंडगेवाडी, ठोंबरेवाडी, रायवुड, जुना खंडाळा)
* उल्हास भांगरे (नांगरगाव, भांगरवाडी)
* प्रवीण काळे (तुंगार्ली, पांगळोली)
* रवींद्र टाकळकर (न्य तुंगार्ली, पिचली हिल)
* कमर अन्सारी (बाजारपेठ, गवठान) - विभागप्रमुख, जिजामाता नगर:
* राजू भोसले
यावेळी पुणे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख श्रीमती शादान भाभी चौधरी, पुणे जिल्हा संघटक भारत दादा ठाकूर, पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख सुरेशदादा गायकवाड, मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, उप जिल्हा महिला आघाडी संगीता सोनवणे, युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे, आणि शिवसेना लोणावळा शहरप्रमुख परेश बेडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, आपल्या पदाला योग्य न्याय देऊन चांगले काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
