इंदोरी: मावळ तालुक्यातील राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या गावांतील गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचासह प्रशांत दादांनी या गावांमधील तरुणांशी संवाद साधला.

या दौऱ्यादरम्यान, गावातील गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे वातावरणात अधिक उत्साह संचारला. तरुण वर्गाने घोषणा देत आपला पाठिंबा स्पष्टपणे दर्शवला.
यावेळी प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत नवनाथ पडवळ, रवी कटलक, संतोष जांभूळकर, जालिंदर शेटे, प्रकाश अगाळमे, विठ्ठल मोहिते, रामदास शिंदे, संकेत शिंदे, भानुदास शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, तुषार आगळमे, सचिन खाणेकर, चंद्रशेखर नवघणे, संतोष काकरे, अॅड. प्रणव गाडे, रामेश्वर नवघणे, जतिंद्र बोर्हाडे, कुणाल बोर्हाडे, अमोल पोटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत दादा भागवत यांना मिळणाऱ्या या प्रतिसादावर बोलताना एका स्थानिकांनी सांगितले की, “प्रशांत दादांचा साधा आणि जमिनीवरचा स्वभाव तरुणांना खूप आवडतो. त्यांच्याकडे ग्रामविकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन आहे आणि यामुळेच त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय.” तरुणांना असे नेतृत्व लाभल्यास गावाचा विकास होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून प्रशांत दादा भागवत यांचा जनसंपर्क दौरा यशस्वी होत आहे. त्यांच्या भेटींमुळे ग्रामीण भागात राजकीय चैतन्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांच्या उत्साहातून त्यांना मिळणारा पाठिंबा आगामी निवडणुकीत त्यांची ताकद वाढवणार असल्याचे दिसून येत आहे.

