लोणावळा : येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाने ग्लोबल इन्फोटेक लोणावळा आणि रोबोकीड्झ पुणे यांच्या सहकार्याने ‘रोबोटिक्स आणि ए.आय.’ या विषयावर दोन दिवसीय आंतरशालेय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत लोणावळ्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

२८ आणि २९ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत रोबोकीड्झ पुणे यांच्या टीमने विद्यार्थ्यांना रोबो क्रेन बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून प्रत्यक्ष रोबो क्रेन चालवण्याचा अनुभवही मुलांना देण्यात आला. या उपक्रमात इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

कार्यशाळेचे उद्घाटन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाळेकर यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर प्राध्यापिका तन्वी भोंडवे यांनी आभार प्रदर्शन केले. समारोप प्रसंगी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सदस्य श्री सुनील ठोंबरे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री विशाल पाडाळे, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्राध्यापिका ॲनी वर्गिस आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रंजू बाला आणि डॉ. अमर काटकर यांनी या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. या आयोजनात ग्लोबल इन्फोटेकचे संचालक श्री योगेश खंडेलवाल आणि रोबोकीड्झचे संचालक श्री सागर संघवी व श्रीमती दिनल संघवी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनीही यासाठी मदत केली
