
लोणावळा – भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाची नवी ‘जंबो’ कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष अनिल उर्फ अनंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या मोठ्या निवडीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव म्हाळस्कर यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या कार्यकारिणीत एकूण ६१ जणांची निवड करण्यात आली आहे. यात विविध पदे आणि मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये मंडळाच्या
- उपाध्यक्ष: माजी नगरसेविका रचना सिनकर, आशा खिल्लारे, प्रसाद हुलावळे, प्रशांत ढाकोळ, सुनील तावरे
- सरचिटणीस: राजाभाऊ खळदकर
- चिटणीस: प्रफुल्ल काकडे, संध्या निकाळजे, विजया वाळंज, आदिती होगले
- खजिनदार: गणेश साठे
- कुसगाव गण अध्यक्ष: शेखर दळवी
- वरसोली गण अध्यक्ष: विनायक कोंडभर
याशिवाय, वेगवेगळ्या मोर्च्यांसाठीही नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे, यामध्ये प्रामुख्याने
- युवा मोर्चा अध्यक्ष: ज्ञानेश्वर गुंड
- महिला मोर्चा अध्यक्ष: परिजा भिल्लारे
- अल्पसंख्याक अध्यक्ष: शाफिकभाई शेख
- ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष – अरविंद कुलकर्णी
या जंबो कार्यकारिणीमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह संचारला आहे.
