माळवाडी : जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटात इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या जनसंपर्क दौऱ्याला माळवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांचे प्रेम, आदर आणि विश्वास पाहून मेघाताई भावुक झाल्या असून या ऊर्जेने त्यांना निवडणुकीच्या शर्यतीत नवचैतन्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांचा जनसंपर्क अलीकडच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आमदार सुनील शेळके यांचाही त्यांच्यावर ठाम विश्वास आहे . मनमिळावू, शांत आणि समंजस स्वभावामुळे गावोगावी त्यांना महिलांकडून, युवा वर्गाकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इंदोरी–वराळे गटात मेघाताई भागवत यांच्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण निर्माण झाले असून लोकाभिमुख कामांची माहिती गावागावांत वेगाने पोहोचत आहे. वाढत चाललेला पाठिंबा आणि ग्रामस्थांचा आत्मीय प्रतिसाद पाहता, येणाऱ्या निवडणुकीत मेघाताई भागवत या दमदार स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.









