“स्त्री असल्याचा फायदा घेत करतात टीका-नागरिकांमध्ये चर्चा
लोणावळा | मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सध्या प्रचंड वेगाने वाहत आहेत. लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष विशेषतः लोणावळ्याकडे लागलेले असताना, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानांनी तालुक्यातील राजकारण अक्षरशः पेटवले आहे.
भाजपच्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत, सुरेखा जाधव यांनी भाषणादरम्यान “मावळात आमचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप म्हणजेच देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आहे” असे विधान करताच वातावरण ढवळून निघाले.
या वक्तव्याला नागरिकांमध्ये, राजकीय वर्तुळात आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सुनील शेळके यांच्यावर वारंवार खालच्या पातळीवर टीका? सुरेखा जाधव यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील चर्चेनुसार, सुरेखा जाधव या आमदार सुनील शेळके यांचा वारंवार एकेरी उल्लेख करत असून, भाषणात वापरलेली भाषा “अत्यंत अशोभनीय आणि दूषित राजकारण करणारी” असल्याची टीका होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पराभव जवळ आल्याची चाहूल लागताच जाधव यांची जीभ अधिकच घसरू लागली आहे. युतीबाबत आदेश असूनही लोणावळ्यात त्यांची मनमानी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तालुक्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच लोणावळ्यातही युती करण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जाते. तरीदेखील सुरेखा जाधव यांनी मनमानी कारभार करत लोणावळ्यात युती न करता स्वतंत्र मार्ग अवलंबल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली आहे. अत्यंत आश्चर्यकारक बाब म्हणजे—
भाजपने कमळाच्या चिन्हावर दिलेले काही उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे सुरेखा जाधव यांची सत्ताकारणातील घडी कोलमडल्याचं दिसत आहे.
स्थानिक पातळीवर अशी चर्चा रंगत आहे की—
“सुरेखा जाधव यांना स्त्री असल्याचा फायदा मिळतो. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना समोरून तितकं उत्तर येत नाही, म्हणून त्या अधिकच खालच्या पातळीवर उतरल्या आहेत.” यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली असून, काही भागात वादाचे तणावपूर्ण वातावरण दिसू लागले आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी “युतीधर्म टिकला पाहिजे, कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे” असा संदेश दिल्यानंतरही,
लोणावळ्यात मात्र सुरेखा जाधव यांनी युतीला पूर्णतः डावलून स्वतंत्र रणनिती राबवल्याचं चित्र स्पष्ट आहे. आमदार सुनील शेळके यांना लोणावळा नगरपालिकेत नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच इतर छोट्या-मोठ्या पक्षनी आमदार सुनील शेळके यांना या नगरपालिकेत पाठिंबा दिला असल्याने सुरेखा जाधव या काहीशा भयभीत झाल्यानेच त्या अशा प्रकारची टीका करत असल्याची चर्चा आता लोणावळ्यात रंगू लागली आहे.

