ज्ञानेश्वर दळवी यांची बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक : धरणग्रस्तांसाठी पुन्हा लढा उभारण्याचा निर्धार

जलसिंचन उपविभागाच्या कारवाईला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ज्ञानेश्वर दळवी मैदानात

पवनानगर, दि. १३ (प्रतिनिधी) : पवना धरण जलाशय हद्दीत असलेल्या अतिक्रमण विरोधात जलसिंचन उपविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सामान्य धरणग्रस्त शेतकरी भरडला जाण्याची भीती निर्माण झाली असून या बाधीत शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा साधन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. याबाबत माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका जाहीर केली आहे.

मंगळवारी यासंदर्भात पवना धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची विशेष बैठक ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पवना उपसा जलसिंचन उपविभागाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला शेतकऱ्यांच्या हितासाठी, रक्षणासाठी उदरनिर्वाहाचे साधरण रक्षणासाठी शासनास निवेदन देणे, शेतकरी लढा उभारणे यासाठी संघटन करणे याबाबच चर्चा करून ठोस धोरण आखणी करण्यात आली.

याप्रसंगी श्री. दळवी यांच्यासोबत पोलीस पाटील तानाजी काळे, शिवाजी काळे, मधुकर काळे, शंकर तात्याराम काळे, बाळु भिका काळे, गणपत निंबळे, हभप शंकर महाराज आडकर, भाऊ नाना भालेकर प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे सक्षम इच्छुक उमेदवार असलेले ज्ञानेश्वर दळवी हे आजपर्यंत पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आजही शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला असता श्री. दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *