लोणावळा : कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी एक विशेष धार्मिक तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता ही यात्रा श्री महालक्ष्मी माता (कोल्हापूर) आणि श्री बाळूमामा दर्शन (आदमापूर) या दोन महत्त्वाच्या पवित्र स्थळांसाठी प्रस्थान करणार आहे.
यात्रेचे आयोजक आणि कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे यांचे सदस्य श्री. बाळुराव (आप्पा) वायकऱ आणि सौ. आशाताई बाबुराव (आप्पा) वायकऱ यांनी सांगितले की, ही यात्रा श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. विशेषतः महिला भक्तांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन धार्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी विनम्र आवाहन केले आहे.
या यात्रेमुळे कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील नागरिकांना एकाच दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद आणि आदमापूरच्या श्री बाळूमामांचे पवित्र दर्शन घेता येणार आहे. ही तीर्थयात्रा सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीभाव घेऊन येणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

