वारकरी संप्रदायाचा पायी पालखी सोहळा २०२५ – इंदोरीत भव्य कीर्तन सोहळा

मावळ तालुक्यातील आमणे लोनाड परिसरात वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाच्या ‘पायी पालखी सोहळा २०२५’ निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर संत आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत पार पडणार असून, स्थळ आहे प्रशांत पेट्रोलियम शेजारी, इंदोरी बायपास, इंदोरी (ता. मावळ, जि. पुणे). या भक्तीमय सोहळ्यास पीर बालयोगी गणेशनाथ महाराज (गोरक्षपिठादेश्वर, भिमाशंकर–त्रंबकेश्वर) यांचे शुभ आशीर्वाद लाभणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प.पू. योगी निरंजननाथ महाराज, सचिव – अखिल भारतीय योगी महासभा तसेच प्रमुख विश्वस्त – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी (दे. पुणे) हे लाभणार आहेत.

भक्ती, ज्ञान आणि संगीताचा संगम घडविणाऱ्या या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन सेवा, वारकरी गंधर्व ह.भ.प. ओंकार महाराज जगताप (आळंदी) यांचे अभंग गायन, भजन सम्राट ह.भ.प. कैलास महाराज पवार (जालना) यांचे भजन तसेच गवळण गायिका शिवानी ताई शिंदे यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमास मृदंग महामेरू कृष्णा महाराज भोरकडे तालसाथ देणार आहेत.

या सर्व भक्तिमय उपक्रमाचे निमंत्रक सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत असून, आयोजनाची जबाबदारी मा. श्री. प्रशांतदादा चंद्रकांत भागवत युवा मंच यांनी घेतली आहे.

भक्तीचा संदेश देणारा आणि वारकरी परंपरेचे वैभव साजरे करणारा हा कीर्तन सोहळा सर्वांसाठी खुला असून, आयोजकांनी सर्व भक्तजनांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सप्रेम आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *