मेघाताई भागवत थेट पवारांच्या भेटीला! इंदोरी-वराळे गटासाठी खासदार सुनेत्रा पवारांचा आशीर्वाद?

मावळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन समिकरणाची चर्चा!

मावळ (प्रतिनिधी): मावळच्या राजकारणात सध्या एका विशेष भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मावळ तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी आणि खासदार सौ. सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या भेटीवेळी युवानेते पार्थ पवार आणि मेघाताईंचे पती प्रशांतदादा भागवत यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेणारी ठरली.

मेघाताई भागवत या त्यांच्या स्थानिक विकासकामांवरील लक्ष, महिला सक्षमीकरणातील सक्रियता आणि व्यापक जनसंपर्कामुळे इंदोरी-वराळे गटातील प्रमुख आणि प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यामागे असलेला मोठा लोकविश्वास ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली ही भेट केवळ औपचारिकता नव्हती, तर या भेटीत मावळच्या विकासाचे मुद्दे, महिलांसाठीच्या योजना आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या धोरणांवर सखोल चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना, मावळच्या राजकारणात घडलेल्या या महत्त्वपूर्ण भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मेघाताई भागवत यांचे थेट खासदार सुनेत्रा पवार यांच्या भेटीस जाणे आणि युवानेते पार्थ पवार यांची उपस्थिती, यामुळे मावळ तालुक्याच्या राजकारणात एक नवा राजकीय ‘गेम चेंज’ होत असल्याची आणि नव्या समीकरणांचा उदय होत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *