भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाचा कार्यकारिणी विस्तार; ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने समावेश
लोणावळा: भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाच्या कार्यकारिणीचा दुसरा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. या…
लोणावळा : भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नवनिर्वाचित नियुक्ती झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे लोणावळा शहरात आगमन झाले असता, शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाडिक यांनी उपस्थित कामगार आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव मांडले. यशस्वी होण्यासाठी ‘संयम’ हाच मंत्र – कृष्णराज महाडिक…
लोणावळा: येथील श्री स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, सन २०२६-२०२८ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी श्री. गिरीशजी पारख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘नवरत्न चिक्की व फरसाण’चे उत्पादक म्हणून परिचित असलेले पारख, अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांवर सक्रियपणे कार्यरत आहेत. गिरीश पारख यांचा समाजकार्यातील दांडगा अनुभव आणि मोठा…
लोणावळा : कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटांमध्ये आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश आणण्यात आला होता. पाथरगाव येथील दत्त मंदिर समोर या रक्षा कलशाचे पूजन करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत ही रक्षा कलश यात्रा लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये सुरू झाली. ज्या नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती…
वडगाव मावळ: तालुक्यातील नवलाख उंबरे येथे पार पडलेल्या ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नियोजनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. पैलवानांच्या ‘खुराका’चे अजितदादांकडून विशेष कौतुकनुकत्याच झालेल्या मावळ दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला….
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या इंदोरी–वराळे गटातील नागरिकांसाठी श्री. प्रशांतदादा भागवत युवामंच यांच्या वतीने विशेष बसची सोय करण्यात आली होती. या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो भीमअनुयायी व महिला भगिनींना सुलभरीत्या शौर्यदिनाचा सोहळा अनुभवता आला. याबद्दल स्थानिक नागरिकांनी भागवत परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत. सामाजिक ऐक्याचा संदेशशौर्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात…
नवलाख उंब्रे (मावळ):मावळ तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ऐतिहासिक सोहळा नवलाख उंब्रे येथे पार पडला. ‘प्रशांत दादा भागवत युवा मंच’ आणि ‘मेघाताई भागवत’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६’ मध्ये कान्हेच्या पै. राहुल सत्यवान सातकर याने प्रतिस्पर्ध्यावर मात करत मानाचा ‘मावळ केसरी’ किताब पटकावला. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरलेल्या…
मावळ: मावळ तालुक्याच्या कुस्ती परंपरेला नवी झळाळी देणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६’ चा वासापूजन सोहळा नुकताच अत्यंत जल्लोषात पार पडला. युवा मंचचे प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या सोहळ्याने आगामी कुस्ती स्पर्धेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. २८ डिसेंबरला रंगणार कुस्तीचा महासंग्रामही भव्य कुस्ती स्पर्धा २८…
दिलेला शब्द पूर्ण करणारे हक्काचे नेतृत्व – मेघाताई प्रशांतदादा भागवत नवलाख उंब्रे गावातील ठाकर वस्ती, रामवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्यासमोर ठाकर वस्तीतील महिला भगिनींनी एक अत्यंत महत्त्वाची व जिव्हाळ्याची समस्या मांडली. वस्तीमध्ये शौचालय नसणे, तसेच जी शौचालये आहेत ती बंद पडलेली असल्याने…
मावळ, (प्रतिनिधी): मावळच्या मातीतील कुस्ती परंपरेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशांत दादा भागवत युवा मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा’ कार्यक्रमाला मावळ तालुका कुस्तीगीर संघाने अधिकृत मान्यता प्रदान केली आहे. या मान्यतेमुळे स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली असून, कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा देत आपला पाठिंबा दर्शविला आहे. तालुका कुस्तीगीर संघाचे अधिकृत मान्यता पत्र वितरण…
जिल्हा परिषद निवडणूक इंदोरी–वराळे गटात जोरदार वातावरण निर्माण झाले असून इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इंदोरी गावठाण भागातील भेटीदरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे मनापासून स्वागत करत प्रामाणिक शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. नागरिकांचा हा…